ज्ञान प्राप्त झालेला बुद्ध

काही लोकांसाठी बुद्ध देव आहे पण व्यवहाराच्या दृष्टीने बोलायचे तर सिद्धार्थ गौतम किंवा सिद्धात्था गोतामा एक नास्तिक होते आणि म्हणून ते स्वतःला एक देव समजत नव्हते. त्यांच्यासाठी, बुद्धाप्रमाणे, जे एक नास्तिक किंवा अज्ञेय म्हणून बाजू स्वीकारतात, तुम्हाला मी माझ्या मागील पोस्टमध्ये सादर केलेल्या अनेक वैश्विक आणि दैविक वितर्कांचा विचार करण्याचे आव्हान देतो.
Atheist and Agnostic
जर देव अस्तित्वात आहे असा आपण निष्कर्ष काढला, तर गुरु आणि बुद्ध यांच्या ऐवजी, आपल्या जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘त्याला’ योग्य समज आणि विचार आहे अशी आम्ही आशा करू शकतो.

त्याचप्रमाणे जे बुद्धाला मान देतात त्यांना हे कसे काय माहित की त्याचे कथन उत्तम प्रकारे जतन करण्यात आले आहे कारण त्यांचे शब्द त्याच्या मृत्यूनंतर 400 वर्षे होईपर्यंत मुद्रित करण्यात आलेले नव्हते? त्याच्या शिक्षणाच्या सामग्रीला सजविण्यासाठी तोंडी परंपरेला भरपूर वेळ मिळाला असेल जेणेकरून या पौराणिक प्रमाणाच्या गोष्टींसाठी दारे मोकळी राहिली. तसेच त्याच्या कथनाला जे गुणविशेष जोडण्यात आलेले आहेत त्यांचा विचार करता, त्यानी मान्यतेनुसार हे शिकविले की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिकवणीच्या विशिष्ट भागांचे महत्व वाटले नाही तर ते त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. म्हणून ज्या व्यक्तीकडे सत्य आहे ती व्यक्ती स्वतःला वस्तुनिष्ठ रीतीने जाहीर का करू शकत नाही?

याच्या व्यतिरिक्त बुद्धाच्या शिकवणींमूळे परस्परविरोधी मतांचा स्वीकार करणाऱ्या अनेक भिन्न मतांच्या प्रवाहांचा आणि विविध पंथांची निर्मिती झाली आहे.

कदाचित असे घडण्याचे कारण असे आहे की या विभिन्न बहुरंगी आणि प्रचंड संसाधनांमध्ये विसंगती आढळून आल्या आहेत आणि त्यामुळे मजकुरांमधील या फरकांमध्ये समेट घडवून आणणे जरी अशक्य नाही तरी कठीण होऊन बसले.

नंतर अगदी स्वत: बुद्ध त्यांच्या ग्रंथकर्तुत्वाच्या नांवे असलेल्या सर्व हस्तलेखांना ओळखतील याविषयी मी साशंक आहे.

असं असलं तरी हा प्रश्न गुंजत राहतो की बुद्ध खरोखर ज्ञानी होते किंवा त्यांना जान झाली होती? या जीवनाच्या परिस्थितीला वस्तूनिष्ठपणे पोहोचले किंवा ही परिस्थिती प्राप्त केली किंवा नाही हे त्यांना किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीला कसे माहित झाले आणि अध्यात्मिक स्वाभाविक प्रवृत्तीची ही घटना मोजण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या उपायांचा वापर करते? ज्ञानाचा दावा करणे ज्ञानाचा एक भ्रम असू शकतो कारण या अध्यात्मिक स्थितीला प्रमाणित करण्यासाठी कोणताही निकष नाही.

ते काय आहे नाही हे सांगण्याच्या शिवाय, स्वतः बुद्ध निर्वाण सारख्या उच्च शब्दांचे वर्णन किंवा त्या शब्दांना परिभाषित करू शकत नाही. जर जान झालेली व्यक्ती तिच्या ज्ञानाच्या अंतिम नियतीला परिभाषित करू शकत नाही, तर एखाद्या व्यक्तीला कशी खात्री असू शकते की ही जीवनाची किंवा बनण्याची एक खरी स्थिती आहे?

असे शक्य असू शकते की हे धार्मिक जागतिक मत फक्त एक खोटे कथन किंवा एक फसवणूक आहे ज्यामुळे जीवनाच्या भेटीच्या चमकदार आनंदाला साजरा करण्याऐवजी नैराश्यपूर्ण आणि सर्व गोष्टी मिथ्या आहेत असे समजण्याच्या तत्वज्ञानाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनाची इच्छा संपवून टाकून मौल्यवान जीवन वाया घालविण्यात आले आहे?

प्रत्यक्षात इच्छा केव्हाही कोणत्याही प्रकारे संपवून टाकली जाऊ शकत नाही आणि वांछित निर्वाणाची स्थिती प्राप्त करण्यासाठी, अध्यात्मिक शिस्तीच्या मठासारख्या जीवन शैलीला अधिक प्रमाणात बांधील असलेल्या भिख्खुंनासुद्धा चार महान सत्त्यांच्या तत्वांचे अनुकरण करण्याची आणि महान अष्टांग मार्गांवर चालण्याची तरीही इच्छा आहे.

स्वतः साठी सुखे नाकारण्याचे हे तत्वज्ञान बुद्धाच्या विचारसरणीला अनुसरून असेल पण या तत्वांच्या आधारे हे लोक त्यांच्या जीवनाच्या बाहेर जगत आहेत का?

त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती, अनिक्का/अनित्या किंवा अनत्त /अनात्मन अशा कल्पनांना कशा प्रकारे सिद्ध करू शकेल? अंतिम विश्लेषणामध्ये, ही फक्त मूर्खपणाची एक विशिष्ठ परिभाषा किंवा शब्द आहेत किंवा हे वास्तव आहे का? स्थिरता आणि टिकाऊपणाच्या कोणत्याही संकल्पनेशिवाय, सर्व जीवनाचा सरकत्या सावल्यांचे एक भ्रामक क्षेत्र म्हणून जीवनाचा अर्थ घ्यायचा का? पुन्हा बौद्ध या आदर्शांचे पालन करीत आहेत का आणि ही गोष्ट त्यांच्या दररोजच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करते का?

दुःख टाळण्यावर भर देण्याच्या कृत्याच्या दिशेने प्रतिसाद देण्याकडे जाताना, हे तत्वज्ञान विलासवादाच्या सामग्रीच्या नकारात्मक समीकरणाचा भाग आहे. हे समीकरण वेदना कमीत कमी करून किंवा टाळून जास्तीत जास्त आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करते.

वेदना आणि दुःख या घटकांचा विचार करता, जर आनंद आणि चांगुलपणाचे विरोधी घटक अस्तित्वात असतील, तर ही संकल्पना प्राप्त केली जाऊ शकते; नाहीतर वेदना आणि दुखः म्हणून समजल्या जाणाऱ्या बाबींशी संबंधित आपल्याकडे काहीही नाही. म्हणून जर काही प्रमाणात चांगुलपणा आणि आनंद प्राप्त केला जाऊ शकतो, तर पेला अर्धा खाली आहे याच्या ऐवजी तो अर्धा भरलेला आहे असे म्हणणे टाळण्याजोगेच्या आहे याच्या ऐवजी ते कौतुकास्पद नाही का? इच्छा पूर्णपणे टाळण्याऐवजी आपण जीवनाच्या सकारात्मक घटकांना आलिंगन देण्याची इच्छा करू नये का? जीवन फक्त अडथळ्यांनी भरले आहे याचा अर्थ असा होतो की पराभव स्वीकार करणे आणि शर्यतीत धावणे टाळणे हे अधिक चांगले आहे किंवा हे आव्हान स्वीकारावे आणि जीवनातील अडथळ्यांना पार करावे हे अधिक फायदेशीर होईल? आपणास माहित आहे की कधी कधी दुखापासून सुंदर गोष्टी निर्माण होतात, परंतु एखाद्या व्यक्तीने हा अनुभव टाळला तर जीवनात माघार घेणे किती सन्माननीय आहे? आम्ही असे नायक बघितले आहेत ज्यांना दुसऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचे जीवन अर्पण करताना आम्ही त्यांची प्रशंसा केली आहे जसे की येशूने वधस्तंभावर आपल्या मृत्यूचे दुःख भोगले. हे मानवजातीसाठी करण्यात आले होते ज्यामध्ये आपल्यासाठी स्वर्गीय राज्याच्या शाश्वत आशिर्वादाला पात्र होऊन आपणास चिरंतन दुखापासून मुक्त करण्यासाठी त्याने आपल्या पापाचा आणि दोषाचा दंड भरला.

मला याची माहिती आहे आणि मी हे मान्य करतो की ती वेदना आणि दुखः एक वाईट गोष्ट आहे जे या अस्तित्वाचा आणि जगाचा एक भाग आहे, परंतु त्याला या वास्तवाला खोडून आणि टाळून दूर केले जाऊ नये. हे वास्तव आपणास आणि आपल्या जगाला अशा हिंसाचारयुक्त अराजकतेपासून वाचविण्याची समस्या दूर करण्यासाठी काहीही करत नाही. ज्या व्यक्ती स्वतः अशा दुर्दैवी परिस्थितींमध्ये सापडल्या आहे अशा व्यक्तींसाठी निष्क्रिय दृष्टीकोन बाळगण्याऐवजी आजारी व्यक्तींसाठी दवाखाने आणि दारिद्र्याने ग्रस्त लोकांसाठी अन्न बँका/आश्रयस्थाने आणि आपल्या टाकून देण्यात आलेल्या तरुणांसाठी अनाथालये बांधणे यावर आपली उर्जा आणि प्रयत्न केंद्रित करणे हे अधिक चांगले आहे.

तसेच मठामध्ये राहून मानवी दुखांची समस्या सोडविली जाऊ शकत नाही आणि विभक्त राहण्याची वृत्ती, या समस्या हाताळण्यासाठी एक प्रगतीशील दृष्टिकोनाच्या ऐवजी जास्त प्रमाणात एक बचावात्मक पवित्रा आहे.

इतरांना मदत केल्याने इतरांचे तन्हा / त्रिष्णा (इच्छा) वाढविण्याच्या वाईट कृत्यात भर घातली जाते अशा वृत्तीचा स्वीकार करणे किंवा कोणत्यातरी प्रकारे असा विचार करणे की हे लोक कोणत्यातरी प्रकारे कर्माच्या सुडाच्या काही प्रारब्धावर आधारित क्षेत्रामुळे खरोखररित्या पिडीत आहेत याच्याऐवजी निराधार व्यक्तींना आणि दुखाने ग्रस्त लोकांची गैरसोय कमी करून इतरांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी ख्रिस्ती धर्माने मानवतावादी मदत पुरवण्यामध्ये स्थान आणि पुढाकार घेतले आहेत.

दु:ख एक शत्रू असू शकते पण उपरोधिकपणे इच्छेचा नाश केल्याने केवळ अधिक दुःखाची निर्मिती होईल आणि अशा दुःखाना बौद्ध धर्म टाळण्याचा प्रयत्न करीत आहे.

या तत्वज्ञानाच्या महत्वाचे आणखी एक उपरोधिक बोलणे हे आहे की ज्या बुद्धाने दुःखाच्या स्त्रोताचा आणि त्याचा कसा नाश करावा याचा शोध लावला तो स्वतः दुःख निर्माण करण्याच्या वाईट कार्याचा निर्माता होता आणि त्याची कृत्ये त्याच्या मिशनच्या परस्परविरोधी होते कारण आपल्या शोधाचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने आपली पत्नी आणि मुल यांच्यासह आपल्या कुटुंबाचा त्याग करून त्यांच्यासाठी कष्ट निर्माण केले.

माझ्या अंतिम विश्लेषणात बौद्ध धर्म आपल्या सर्वांत सोप्या रुपात आत्मकेंद्री आणि स्वार्थी वाटतो कारण जरी इतरांना सन्मानाने वागविण्याच्या मुलभूत नैतिक आचारसंहितेचे तो पालन करीत असला, तरी त्यांच्या स्वतः च्या फायद्यासाठी, म्हणजे निर्वाणसाठी पात्र होण्याचा एक मार्ग म्हणून त्यांचे स्वतः च्या वैयक्तिक समस्या सोडविण्या साठी स्वतः च्या हितासाठी बौद्ध धर्म हे करतो.

म्हणून जर बौद्ध लोकांसाठी अंतिम ध्येय आणि प्रेरणा ही स्वतः चे दुःख दूर करणे आहे तर इतरांशी साधण्यात आलेला सुसंवाद हा केवळ ते ध्येय प्राप्त करण्याचे एक साधन म्हणून बघितले जाते.

तथापि येशूचा माणुसकीविषयी दुसरा दृष्टीकोन होता ज्याद्वारे त्याने आपले जीवन अनेक लोकांसाठी एक खंडणी म्हणून अर्पण करून, स्वतःची सेवा केली जावी या हेतूच्या ऐवजी तो निःस्वार्थीपणे सेवा करण्यासाठी आला.

शेवटी बौद्ध लोकांच्या विचारानुसार जबाबदारी किंवा न्याय या संकल्पना कर्म आणि पुनर्जन्माच्या प्रणालीतून येतात.

दलाई लामा सारखा थोर आध्यात्मिक नेता हद्दपार आहे किंवा साम्यवादी चीनी द्वारे तिबेटी बौद्ध साध्विंवर करण्यात आलेला बलात्कार हा मागील जीवनातील काही प्रकरच्या कर्मामुळे घडून आला यांवर विश्वास करणे हा मला एक प्रकारचा विरोधाभास वाटतो.

तसेच मी असा विचार करीत आहे की एका नास्तिक व्यक्तीला, जी व्यक्ती सर्वोच्च आत्म्याला नाकारते, आणि बदला घेण्याच्या या प्रणालीचे कशा प्रकारे व्यवस्थापन शक्य झाले आणि तथापि कोण अशा विश्वास प्रणालीचे वृंदवादन करू शकते? शेवटी काही स्वरूपाच्या शिस्तबद्ध पद्धतीला प्राप्त करण्यासाठी कुणीतरी कामाच्या या तपशीलपूर्ण पद्धतीचे निर्धारण आणि मूल्यमापन करणे आवश्यक आहे. अशा अनाकलनीय बाबीची देखरेख करण्यासाठी एक सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी मानवाची गरज पडेल जो निश्चितपणे स्वतः एक देव आहे आणि म्हणून एक देवाचे अस्तित्व कशा प्रकारे नाकारले जाऊ शकते?

याच्या व्यतिरिक्त, या पुनर्जन्मांच्या अंतहीन पुनरावृत्तीपासून स्वतःला मुक्त करण्यामध्ये अंतिम प्राप्ती आणि नियती आहे, तर जीवनाच्या या क्षेत्राविषयी एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे कशी खात्री असू शकते?

कुणी कधी निर्वाणाला तपासले आहे का आणि त्यांची कथा सांगण्यासाठी ती व्यक्ती परत आली आहे का? हा एक खराखुरा अनुभव आहे किंवा ते आंधळ्या विश्वासावर अवलंबून आहेत? मी जीवनानंतरच्या किंवा मृत्यू जवळच्या अनुभवांवर एक ब्लॉग केला आहे जो तुमच्यासाठी उपयुक्त आणि मनोरंजक असू शकेल.
Is Hell Real?
बौद्ध तत्त्वज्ञानच्या प्रतिसादास्तव मला एक पर्यायी मत मांडणे आवडेल. हे मत सांगते की येशू या जगाचा प्रकाश आहे आणि ती ‘अशी व्यक्ती’ आहे जी प्रत्येक व्यक्तीचा मार्ग उजळवून टाकते आणि जर एक प्रभू आणि रक्षणकर्ता म्हणून आम्ही ‘त्याच्यावर’ विश्वास ठेवला तर ‘तो’ आपल्याला या दुःखमय जगातून काढून जाणीवेच्या गुप्त स्थितीच्या एखाद्या प्रकारामध्ये, स्वतः च्या प्रयत्नांच्या परिश्रमाने नव्हे तर आपल्यासाठी स्वर्गीय आशिर्वादाची एक शाश्वत नियती निश्चित करून, घेऊन जाईल.

माझा 20 वर्षांपूर्वी येशूशी संबंध आला आणि ‘त्याने’ माझे आयुष्य मुलतः बदलून टाकले आहे आणि अस्तित्वाच्या माझ्या तात्पुरत्या निवासाचा तिरस्कार करण्याऐवजी मला जीवन जगण्याच्या इच्छेने भरून टाकले आहे.

जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या साक्षीविषयी येथे वाचू शकता:
My testimony with Jesus
तसेच हरकतीचा दुसरा एक मुद्दा हा आहे की बौद्ध धर्माने शैक्षणिकदृष्ट्या जे जे काही प्राप्त केले आहे त्याने हे हिंदू विचार प्रणालीतून केले आहे.

हिंदू धर्मापासून बुद्ध भरकटला असेल, पण तो एक हिंदू म्हणून जन्माला, जगाला आणि मृत्यू पावला आणि म्हणून जरी बौद्ध धर्मात जनुकीय रीतीने बदल झाला तरी बौद्ध धर्माचे आपल्या हिंदू या मुळच्या धर्माशी आश्चर्यकारक साम्य आहे.

पुन्हा बौद्ध पिंपळाच्या झाडाने घट्टपणे हिंदू धर्मात मूळ पकडले आहे. एक धार्मिक संस्था म्हणून बौद्ध धर्माची दृश्यमानता राखण्यासाठी एक महत्वाची समर्थन संरचना म्हणून त्याने त्याकडून पोषण घेतले आहे.

दुसऱ्या शब्दांत, जरी या दोन धार्मिक संस्कृती दरम्यानच्या समजुतींमध्ये फरक आहे, तरी भारतीय गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय बौद्ध धर्म अस्तिवात राहिला नसता आणि म्हणून ज्या बुद्धापासून त्याला त्याचे नांव मिळाले या बाबीमध्ये त्याची उत्पत्ती आहे यात अस्सलपणाचा अभाव आहे परंतु उलटपक्षी त्याची ओळख मुख्यतः दुसऱ्या स्त्रोतापासून येते.

म्हणून तुम्ही तुमची सर्व चोरलेली अंडी बौद्ध शिकवणीच्या तीन टोपल्यांमध्ये ठेवू इच्छिता का किंवा तुम्ही जीवनाचा आनंद घ्यावा आणि अधिक मुबलक प्रमाणात जीवनाचा आनंद घ्यावा म्हणून ज्याने तुमची इच्छा केली आणि तुमची निर्मिती केली अशा प्रेमळ आणि परोपकारी देवाच्या संरक्षणात्मक हातांत तुम्ही स्वतःला सोपवू इच्छिता ?

शेवटी हा युक्तिवाद कोणाकडे सर्वोत्तम तत्वज्ञान किंवा सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे यांविषयी नाही परंतु ही बाब सत्याच्या शोधाविषयी आणि त्या सत्याला आपल्याला अपरिहार्य गोष्टीच्या मार्गाच्या दिशेने घेवून जावू देण्याविषयी आहे. प्रत्येक मनुष्याच्या मार्गात प्रकाश निर्माण करण्यासाठी ख्रिस्त आला परंतु तुमच्याकडे असणारा एकच प्रकाश जर खरोखर केवळ अंधार आहे तर तुम्ही तुमचा मार्ग कसा शोधाल.

परंतु बायबल आपणास प्रोत्साहन देते की देवाचे शब्द आपल्या पायांसाठी एक दिवा आणि आपल्या मार्गासाठी प्रकाश आहे.

शेवटी मी आशा करतो की माझ्या वक्तृत्वाचा, योग्य भाषणाचा केवळ एक उल्लंघन म्हणून गैरसमज केला जाणार नाही आणि जरी माझे शब्द कटू वाटले, तरी मला अस्सल चिंतेची एक प्रेरणा आहे ज्यामुळे इतरांसाठी फायदा शोधण्यासाठी माझ्या मुद्याला मांडण्याचे कष्ट करण्यासाठी मला भाग पाडले जाते. जर मी माझे म्हणणे उद्धटपणे मांडले असेल किंवा तुमचा विनाकारण अनादर केला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगीर आहे कारण या गोष्टी मऊ रीतीने कशा सांगाव्यात त्याचवेळी या गंभीर संकल्पनांचे गांभीर्य कसे कथन करावे याची मला कल्पना नाही.

एका बौद्धप्रमाणे, मी या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवतो की बरोबर आणि चूक यांच्या जबाबदारीची प्रणाली अस्तित्वात आहे. हे आदर्श आपल्या अस्तित्वाच्या मेनफ्रेम मध्ये घट्टपणे बसविलेले आहेत ज्याद्वारे देव आपल्या आतील भागांना सत्य सांगतो जेणेकरून आम्ही सहजप्रवृत्तीने जाणतो की आपल्या जीवनाच्या निर्णयांना परिणाम आणि निर्णय आहेत आणि जेव्हा बुद्ध धर्म हे कमीत कमी प्रमाणात मान्य करतो तेव्हा हे सन्मानीय आहे परंतु धार्मिक व्यवहाराच्या स्वतःच्या प्रयत्नातून चेतनेचे शमन करण्याचा एखादा मार्ग शोधून काढणे म्हणजे मानवता जे दोषीपणाचे ओझे टाकून देण्यासाठी इतके कष्ट करीत आहे त्याला हटविण्यासाठी समर्थ असलेल्या ‘त्या व्यक्ती’ शी वैयक्तिक संबंध ठेवण्याच्या वास्तवाशी केवळ एक बनावट वर्तणूक आहे.

शेवटी, प्रभू चांगला आहे याची परीक्षा घेण्यासाठी आणि बघण्यासाठी आणि व्यक्ती आणि येशूच्या कार्याचे अन्वेषण करण्यासाठी तुमचे अंतः करण उघडे करण्यासाठी मी तुम्हाला फक्त विनंती करेल की हे एक आमंत्रण समजावे.

शेवटी मला तुमचा एका पवित्र ग्रंथाने निरोप घ्यायला आवडेल. या पवित्र ग्रंथाचे कथन येशूने मत्तय 11:28-3028 मध्ये केले आहे “जे परिश्रम करतात आणि ज्यांच्यावर ओझे लादलेले आहे असे सर्वजण माझ्याकडे या, आणि मी तुम्हाला विश्रांति देईन. 29 माझे जू तुमच्या खांद्यावर घ्या, आणि माझ्याकडून शिका, कारण मी अंत: करणात सभ्य आणि नम्र आहे, आणि तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल. 30 कारण माझे जू सोपे साधे आहे, आणि माझे ओझे हलके आहे.”

 

 

बौद्ध संसाधने

मराठी-Marathi

Buddha the Enlightened One

 

 

Copyright permission by Bridge-Logos “The School of Biblical Evangelism”

Leave a Reply