हिंदू आणि पुनर्जन्म

मृत्यूनंतरच्या जीवनाच्या कर्माविषयक परिणामांचा सामना करण्याचा एक मार्ग म्हणून अनेक पौर्वात्य धर्म पुनर्जन्माचा विचार करतात. हिंदू लोक जीवनाला जन्म, मृत्यू, आणि पुनर्जन्म यांच्या संसार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चक्रीय मतातून बघतात. हे चक्रीय मत मागील योग्य आणि चुकीच्या कार्यांचा थेट परिणाम असतो आणि संसारापासून मुक्तीचे एक स्वरूप म्हणून मोक्ष किंवा मुक्तीच्या इच्छित स्थितीकडे पोहोचण्यासाठी व्यक्तीने ही कार्य केलेली असतात. त्यामुळे काही स्वरूपाची शुद्ध स्थित प्राप्त करण्यासाठी “जे जाते ते पुन्हा येते” अशा प्रकारच्या अस्तित्वाच्या चक्रापासून सुटका करून घेणे ही हिंदूची अंतिम सिद्धी आहे.
भौतिक क्षेत्रातून शेवटी स्वःताच्या आत्म्याला किंवा आत्मानला मुक्त करण्यासाठी ज्ञान, भक्ती आणि कार्य या घटकांना आधारून एखादी व्यक्ती योग करण्याचे कष्ट करते तेव्हा अस्तित्वाची किंवा मुक्तीची ही अंतिम स्थिती साध्य करण्याच्या पद्धती येतात.

तथापि, जरी त्यांच्या धार्मिक समजुतींची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून विश्वासाचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तीद्वारे तिला मान्य केले गेले असेल आणि स्वीकारले असेल तरी समजुतीची ही पद्धत सिद्ध करण्याजोगी नाही. मृत्युनंतर जीवनाच्या या घटनेसंबंधी प्रायोगिक माहितीच्या काही स्वरूपाचे संशोधन करताना सर्व जगभर हिंडलेल्या व्यक्तींच्या आणि डॉक्टरांच्या मुलाखतींवर आधारित मी नुकतेच एक ब्लॉग पोस्ट केले आणि त्यांच्या संशोधनावरून लक्षात आले की वारंवार येणाऱ्या जीवनांच्याद्वारे या क्षणिक पापक्षालनाविषयक प्रकारांच्या ऐवजी मृत्यूनंतरच्या जीवनाचे बायबलसंबधी कथनात वर्णन करण्यात आल्याप्रमाणे लोक एकतर नरकासारख्या किंवा स्वर्गीय क्षेत्राचा अनुभव करीत होते.

Is Hell Real?


सुरुवात करताना मी निश्चित विश्वास करतो की हिंदू धर्म वाईट गोष्टीची समस्या आणि या वास्तवाचे परिणाम जाणतो, तरी सुद्धा मी अगोदर उल्लेख केलेल्या मृत्यूच्या जवळच्या अनुभवांच्या माहितीद्वारे आणि बायबलसंबंधी नोंदीवरून हे कसे नियंत्रित केले जाते याविषयी त्यांची मते भिन्न आहेत.

रोमन 1 आणि 2 मध्ये असे वक्तव्य केले गेले आहे की देवाने मनुष्यजातीला पापाचा पायाभूत स्वभाव आणि न्यायाची किंवा निर्णयाची कल्पना आपणास दर्शविण्यासाठी एक नैतिक होकायंत्र दिले आहे जे आपल्या जीवनातील मेनफ्रेममध्ये घट्ट बसविले असून ते योग्य आणि चुकीच्या गोष्टींविषयीचे अध्यात्मिक वायुभरमापक आहे. हे ज्ञान सामान्य आहे आणि ते आपणास मानव बनविते, तथापि या नैतिक दुविधेच्या कार्यामुळे या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या अनुषंगिक कल्पनांना प्राप्त करताना ख्रिश्चन समजूत विरुद्ध हिंदू विचार अशी तफावत निर्माण होते.

बायबलची अशी धारणा आहे की मनुष्यास एकदा मरावे लागेल आणि निर्णयाचा सामना करावा लागेल, उलटपक्षी हिंदू आत्म्याच्या देशांतरामध्ये विश्वास करतो ज्यामुळे जे कधीतरी जीवनाच्या वांछित स्थितीमध्ये बदलणाऱ्या कारण आणि परिणाम प्रकारच्या संबंधापासून निर्माण होणाऱ्या स्वतःच्या अस्तित्वाच्या नुतनीकरणाकडे घेऊन घेऊन जाते.

हिंदुत्ववादी जागतिक मताच्या संदर्भात मी ज्या काही समस्यांचे निरीक्षण केले आहे, ज्याविषयी मला खात्री आहे की ते मानवी जीवनाच्या पवित्र्याच्या संघर्षात किंवा विरोधात आहे, ते मानवी जीवनापेक्षा विशिष्ट प्राणी आणि झाडे यांना अधिक पावित्र्याची आणि आदराची वागणूक दिल्यामध्ये दिसून येते. मी ज्यांचा संदर्भ देत आहे ते असे लोक आहेत ज्यांना दलित किंवा “अस्पृश्य” म्हणून शीर्षक देण्यात आले आहे किंवा वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा लोकांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपैकी एक पंचमांश आहे.

काही उदाहरणांमध्ये अशा स्वरूपाचा वंशविद्वेष गुलामगिरी सारखा आहे ज्याला सरकारने औपचारिकपणे बंदी घातली आहे, पण भारतीय समाजातील बहुसंख्य हिंदू लोकांद्वारे त्याला अनौपचारिकपणे समर्थन दिले जाते.

त्यांच्या संस्कृतीच्या यशाला मदत करण्यासाठी, नोकर म्हणून त्यांची हलकी कामे करण्यासाठी अशा प्रकारच्या व्यक्तींवर अवलंबून राहिल्याने प्रत्यक्षात ही धार्मिक दडपशाही समाजाच्या राजकीय आणि सामाजिक संरचनेला नियंत्रित करण्यात मदत करते आणि म्हणून या खालच्या जातीतील लोकांविषयी ही कमीपणाची आणि अकार्यक्षम बनविणारी वर्तणूक एक आवश्यक वाईट कृत्य म्हणून सरकारद्वारे सहन केले जाते.

असे म्हटले जाते की वाईट कर्माच्या परिणामांमुळे या लोकांचा खालच्या स्थानावर जन्म झाला आहे आणि म्हणून ही दडपशाहीची प्रारब्धावर आधारित वस्ती निर्माण झाली आहे. समाजाचा निरोपयोगी असलेला भाग असलेल्या या व्यक्तींविषयीची ‘कोणतीही हानी नाही’ या धोरणाला अहिंसेचे हिंदू तत्वज्ञान कशा प्रकारे टाळू शकते याविषयी तथापि मला आश्चर्य वाटते.

सर्व मानवजातीला देवाने दिलेले उच्च महत्व त्यांना दाखवून ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी ख्रिस्ताचे प्रेम दलितांशी सामायिक केले आहे आणि मूलगामी हिंदूंनी अहिंसेचा त्याग करून ख्रिश्चन दलित आणि धर्मप्रचारक या दोन्हींवर हल्ला करून आणि त्यांना इजा करून या प्रयत्नाविरुद्ध बंड केले आहे.

तथापि ते ज्या बाबीविरुद्ध आंदोलन करीत आहे ती बाब आहे त्यांच्या पद्धतीच्या निर्वाहावर त्यांच्या नियंत्रणाचे नुकसान आणि त्यांनी हिंसा आणि भीती दाखविण्याचा पद्धतींचा अवलंब केला आहे जे त्यांना शांततावादी म्हणून दाखविणाऱ्या त्यांच्या धार्मिक मतांच्या परस्परविरोधी आहे.

काही हिंदूंसाठी, अहिंसेचा अर्थ होतो मांस आणि देवतेला दिला जाणारा बळी यांना वर्ज्य करणे, तथापि हिंदू धर्माच्या देवांचे समाधान करण्यासाठी या तथा कथित खालच्या जातीच्या लोकांचा बळी देणे मान्य आहे का?

तसेच वादाचा आणखी असा मुद्दा तो म्हणजे हिंदू विचारातील हा चुकीचा समज की मानवी जीवनाला असीम मागे जाण्याची क्षमता आहे तथापि दुसरीकडे हिंदू समजूत एका मर्यादित पृथ्वीचे समर्थन करते. “बिग बँग” नावाच्या सुरुवातीचा टप्प्यापासून निर्माण झालेल्या चालू असलेल्या वैश्विक विस्ताराचे त्यांच्या दूरदर्शक दुर्बिणीतून निरीक्षणाद्वारे विज्ञानानेसुद्धा या स्थितीची एक मर्यादित विश्व पुष्टी केली आहे.

असा तर्क करणे की मानवी आत्मा अस्तित्वाच्या मर्यादित क्षेत्रात अमर्यादितपणे उपस्थित आहे केवळ एक मूर्खपणा आहे.

म्हणून जर जीवन मर्यादेसाठी अविभाज्य आहे तर पहिले मानव कशा प्रकारे जन्मास आले आणि जर ते पूर्वीपासून अस्तित्वात नव्हते तर ते कर्माच्या वैश्विक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे सहभागी झाले. दुसऱ्या शब्दांत, एखाद्या अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीने मागील कृत्य केलेले नव्हते याचा विचार केला तर पहिल्या जन्माला कशाने भाग पाडते? कशातरी प्रकारे देवाच्या बाबतीत बिग बँग घडले का आणि मोक्षाच्या प्रयत्नातून आता आपणास त्याचे तुकडे एकत्र बसवायचे आहेत का?

म्हणून जर पुरावा वेळेच्या आरंभाच्या बिंदुला दर्शवितो तर आपणास माहित असलेल्या आयुष्याचा कशा प्रकारे उगम झाला आणि पहिल्या जन्माला कशाने भाग पाडले कारण जन्म होण्याची प्रक्रिया या कर्माविषयक चक्राचा परिणाम आहे.

शिवाय कर्माशी संबंधित इतर बाब ही आहे की मागील जन्मातील तुम्हाला माहित नसलेल्या कार्यांबद्दल तुम्ही कशाप्रकारे जबाबदार असू शकतात किंवा मागील प्रतिसादांचे शमन करण्यासाठी आपण पुरेसे कार्य केले आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे समजणार? कुणाला माहित आहे की एखादी व्यक्ती कोठे आहे आणि ती व्यक्ती कोठे जात आहे आणि शेवटी ती व्यक्ती कोठे पोहोचणार आहे? हे व्यक्तीला फक्त एक प्रकारच्या शून्यवादाकडे आणि निराशपणाकडे घेऊन जाते. शेवटी एक व्यक्ती एखाद्या निर्धारक योजनेशिवाय राहते. अशा योजनेमुळे त्यांना मोक्षाच्या महत्वाच्या घटकाची सुरक्षितता मिळू शकते.

तसेच ज्यांच्याकडे सहजप्रवृत्तीद्वारे योगाची कर्तव्ये पार पडण्याची क्षमता नाही अशा हलक्या जीवनाच्या स्वरुपात पुनर्जन्म झालेल्या किड्यांच्या आणि प्राण्यांच्या निराशपणाविषयी काय किंवा एक गटारीतील घूस म्हणून त्यांच्या भविष्यातील जीवनाविषयी चिंतन करीत आहे अशा व्यक्तीसाठी कोणती आशा उपलब्ध आहे?

जर भारतीय संस्कृती गुरुचे कौशल्य लाभलेल्या जगाचा कळस आणि अध्यात्मिक केंद्र आहे, तर ज्ञान प्राप्त झालेल्या समाजाच्या तर्कशास्त्रावर आधारित भारतामध्ये इतके अधिक कर्माविषयीचे पापी लोक का आहेत? शेवटी सर्व कुष्ठरोग प्रकरणांपैकी 2/3 आणि जगातील अर्ध्यापेक्षा अधिक अंध लोक या विश्वासाच्या कर्मभूमीत राहतात.

शेवटी मला असे वाटते की समजुतीचे हे तुटलेले चाक उपासकाचे ओझे पेलू शकत नाही किंवा वाहू शकत नाही. अशा उपासकांनी हिंदू धर्माच्या पवित्र गाईला कामाला लावलेले आहे आणि ही गाय त्यांना त्याच्या अंतिम किंवा शेवटच्या गंतव्याकडे घेऊन जाईल या आशेने गुरूंच्या लगामांद्वारे तिचे मार्गदर्शन केले जात आहे.

मग पुन्हा ही संपूर्ण प्रणाली फक्त खोटे मृगजळ किंवा माया असू शकते जिला एखाद्या व्यक्तीला ज्या तत्त्वज्ञाला कोणत्याही प्रकारचे अंतिम वास्तव नाही अशा तत्वज्ञामध्ये विश्वास ठेवण्याकरिता फसविण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

शेवटी मला माहित आहे मी काही कटू बाबी सांगितल्या आहेत आणि मला माझ्या हिंदू मित्रांचा अनादर करण्याची इच्छा नाही, परंतु त्यांच्या समजुतीच्या धार्मिक प्रणालीवर मनन करण्यापासून दूर ठेवणाऱ्या त्यांच्या विश्वासाच्या सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे विचार करण्याचे आव्हान त्यांना देणे मला आवडेल. पुन्हा जर मी या लेखाद्वारे कुणाचाही अपमान केला असेल तर मी दिलगीर आहे, तथापि आक्रमक झाल्याशिवाय आव्हान देणे कधीही सोपे नसते आणि मी फक्त इतकीच अशा करतो की तुमच्या समजुतीच्या संबंधित सत्याच्या दाव्यांच्या वैधतेवर विचार करण्यासाठी तुम्ही तुमच्या अध्यात्मिक प्रवासात काही क्षण काढावेत.

सरते शेवटी मला विश्वास आहे की सर्व लोकांसाठी आशा आहे. ही आशा येशू प्रदान करतो, परंतु ती आशा हे करावे आणि हे करू नयेच्या धार्मिक प्रयत्नांतून प्रदान केली जात नाही तर त्याच्या अस्तित्वावर आणि कार्यावर विश्वास ठेवण्याच्या साधेपणाद्वारे प्रदान केली जाते. यामुळे तुम्हाला पुनर्जन्माच्या कल्पनेतून बाहेर काढून नवीन जन्माकडे नेऊन तुम्हाला तुमच्या आत्मच्या शुन्यतेपासून आणि दोषपूर्ण जाणीवपासून मुक्त केले जाईल.

येशू मत्तय 11:28-3028 मध्ये म्हणाला “जे परिश्रम करतात आणि ज्यांच्यावर ओझे लादलेले आहे असे सर्वजण माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांति देईन. 29 माझे जू तुमच्या खांद्यावर घ्या, आणि माझ्याकडून शिका, कारण मी अंत: करणात सभ्य आणि नम्र आहे, आणि तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल. 30 कारण माझे जू साधे आहे, आणि माझे ओझे हलके आहे.”

 

 

हिंदू संसाधने

मराठी-Marathi

Hinduism and Reincarnation

 

 

 

Copyright permission by Bridge-Logos “The School of Biblical Evangelism”

Copyright permission by Random House Inc./Multnomah on New Birth or Rebirth by Ravi Zacharias

Leave a Reply