काही लोक या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात की देव म्हणून एका श्रेणी अंतर्गत सर्व धार्मिक विचार आणि आचार यांना जोडणाऱ्या बाबीमध्ये एक सामान्यता आणि साम्य आहे. परंतु हा पृष्ठभागावरच्या स्तरावरील दृश्य हे टायटॅनिक जहाजाप्रमाणे आहे जे धार्मिक विविधतेच्या समुद्राचे जलपर्यटन अशा फाजील आत्मविश्वासाने करते ज्याला फक्त हिमखंडाचे टोक दिसते परतू जे पृष्ठभागाच्या लगेच खाली असलेल्या भव्य आणि भ्रामक नाशाचा गंभीरपणे विचार करण्याकडे दुर्लक्ष करते आणि या शापित आणि बुडणाऱ्या जहाजावर प्रवेश करणारा प्रवाशी कोणत्याही सुरक्षित बंदरावर पोहोचू शकणार नाही, परंतु त्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या पद्धतीने ते जहाज अविनाशी असल्याच्या एका भ्रामक भावनेने त्यांचा बुडून मृत्यू होईल.
अनेक लोकांच्या हे लक्षात येत नाही की यातील बहुतेक धार्मिक जागतिक मते इतकी विरोधी आणि भिन्न आहेत की ते स्पष्टपणे विकोपाला गेलेली आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती तुलनात्मक धर्म / पंथ यांचा अभ्यास करते तेव्हा हे ज्ञान येते आणि एका सोनार प्रमाणे त्याच्या धोक्याला मर्यादित मत आणि व्याप्ती यांपासून वेगळे मांडून ते त्याचा खरा आकार आणि रूप पाहून लक्षणीय फरक बाजूला करतात.
एक हिंदू म्हणू शकतो की ही समस्या नाही कारण विरोध त्यांच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे पण ते म्हटल्याप्रमाणे करीत नाहीत कारण त्यांचे दररोजचे जीवन तर्कशास्त्र आणि कारण प्रतिबिंबित करते जरी ते धर्माच्या तत्वज्ञानाला लागू होते आणि मूलगामी राष्ट्रवादी हिंदू इतर धार्मिक चळवळीविषयी विरोधी आहेत आणि पाश्चिमात्य लोकांचे धर्मांतरण करण्यासाठी पौर्वात्य गुरु नेहमी उत्सुक असतात.
व्यावहारिक दृष्ट्या बोलायचे तर जीवनाचा रस्ता रुंद करण्यासाठी या मार्गांतील दरी दूर करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या स्पर्धात्मक अनेक देवांवर विश्वास ठेवण्याच्या समजुतीच्या भूतकाळातील तणावाची समस्या सोडविण्यासाठी या संपूर्ण कल्पनेची उत्क्रांती झाली, तरीसुद्धा धार्मिक अनेकतत्ववादाच्या नेत्यांचे अनुकरण करताना ही कळपाची मानसिकता त्यांना कड्यावरून खाली पाडून देईल.
असं असलं तरी देवाविषयीच्या या कल्पनेचे कथन करताना काही लोकांनी अंध मनुष्य आणि हत्ती यांच्या समानतेचा वापर केला आहे आणि जरी आपल्या जीवनाच्या मेनफ्रेममध्ये घट्ट बसविण्यात आलेली, मानवतेमध्ये सामान्य असलेली देवाविषयीची संकल्पना असली तरी हे नेहमी वास्तवाच्या खऱ्या सहसंबंधाकडे घेऊन जात नाही.
फक्त आंधळी व्यक्ती दावा करते की देवाचे वर्णन केल्याने तिला दिसते याचा अर्थ असा होत नाही की ते खोटे बोलू शकत नाहीत किंवा त्यांना कदाचित फसविले जाऊ शकत नाही. प्रवृत्त करणारा घटक म्हणून अशा प्रकारची काल्पनिकता दिशाभूल करू शकणारी असू शकते कारण स्वतःच्या हितांच्या विविध कारणांमुळे एखाद्या व्यक्तीची समज अपूर्ण असू शकते कारण धार्मिक शिक्षक, गुरु, ऋषी आणि योगी यांच्या मार्गांचे अनुकरण करणे फाजील धीट असू शकते. असे कोण म्हणू शकते की ते खरोखरचे देव आहेत कारण त्यांच्या मूर्तीपूजेविषयक इच्छांशी मेळ खाण्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे आणि रूपाप्रमाणे देवाची निर्मिती करण्याच्या एका सर्जनशील आणि कल्पनारम्य प्रक्रियेशिवाय हे दुसरे काही असू शकत नाही. येशू चेतावणी देतो की जगात खोटे संदेष्टे किंवा आंधळे गुरू असू शकतात, जे एखाद्या आंधळ्या व्यक्तीने दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखविण्याप्रमाणे असू शकते, परंतु ते दोन्ही चुकीच्या आणि बंद रस्त्याकडे जाऊ शकतात.
येथे बायबलला या प्रकरणावर खालील बाबी कथन करायच्या आहेत
मत्तय 24:24
24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे निर्माण होतील आणि चुकीच्या मार्गाकडे घेवून जाण्यासाठी आणि शक्य असेल तर, निवडण्यासाठी सुद्धा महान चमत्कार आणि आश्चर्य पार पाडतील.
रोमन 1: 18-23
आपल्या अपराधी कृत्यांद्वारे सत्य दाबून ठेवणाऱ्या व्यक्तींची नास्तिकता आणि अपराधित्व यांच्या विरुद्ध देव स्वर्गातून क्रोध प्रकट करतो. 19 देवाविषयी काय जाणले जाऊ शकते हे त्यांच्यासाठी स्पष्ट आहे, कारण देवाने ते त्यांना दाखविले आहे. 20 जेव्हापासून जगाची निर्मिती झाली आहे, ज्या गोष्टी बनविण्यात आलेल्या आहेत, त्याचे अदृश्य गुणधर्म , म्हणजे, त्याचे शाश्वत सामर्थ्य व दैवी स्वभाव, यांचा स्पष्टपणे अनुभव केला गेला आहे. त्यामुळे त्यांचाकडे सबब नाही. 21 जरी त्यांनी देवाला जाणले, तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही किंवा त्यांनी त्याचे आभार मानले नाहीत, पण ते त्यांच्या विचारात निष्फळ झाले आणि त्यांची मूर्ख अंतःकरणे काळी पडली. 22 स्वत: ला शहाणे समजण्याचा दावा करत ते मूर्ख बनले, 23 आणि मर्त्य मानव आणि पक्षी आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांच्या सदृश प्रतिमांमध्ये अविनाशी देवाच्या गौरवाची अदलाबदल केली.
शेवटी देवाविषयीची सर्व मते तितकीच वैध आहेत आणि कोणतेही परिपूर्ण मत मूलतः योग्य आहे असे कथन करणे, सर्व मते तितकीच वैध आहेत या त्यांच्या विधानाला लागू करण्याइतके स्वतःचे खंडन करण्यासारखे आहे. याशिवाय प्रत्येक अभिव्यक्ती अधिक मोठ्या संपूर्ण भागाचा केवळ एक छोटा भाग आहे असे म्हणणे विवादित आहे कारण मूलतः महत्वाचे म्हणून हिंदू त्यांचे स्वत: चे वेगळेपण आणि एकमेवत्व यांना महत्व देतात, अन्यथा देवाच्या त्यांच्या अनुभवामध्ये इतर गटांमध्ये सामील होण्यासाठी किंवा त्या कारणास्तव इतर असंबधित धर्मामध्ये सामील होण्यामध्ये त्यांना काही समस्या किंवा विरोध यांचा सामना करावा लागला नसता. शिवाय आमच्याकडे फक्त थोडे सत्य आहे असे म्हटले, तर शेवटी किंवा मूलत: खरे म्हणून परिणामकारक होण्यासाठी त्यांचाकडे पुरेशी माहिती आहे याची त्यांना कशामुळे खात्री पटते.
शेवटी विविध श्रद्धा किंवा श्रद्धा पद्धती यांना सामावून घेणे ही एक गोष्ट आहे आणि प्रत्येक श्रद्धा तितकीच वैध किंवा खरी आहे हे सिद्ध केले जाऊ शकते असे ही एकदम वेगळी गोष्ट आहे. अशा प्रकारे धार्मिक सहिष्णुता एक बाब आहे; तर धार्मिक संश्लेषण, परस्परसंबंधता, समाविष्टता, आणि सार्वत्रिकता या अगदी वेगळ्या बाबी आहेत. सहनशीलता ही एक चागली गोष्ट आहे परंतु ती सत्याच्या मानकाची जागा घेऊ शकत नाही आणि देवाकडे जाण्याचे “अनेक मार्ग” किंवा वैध मार्ग आहेत असे म्हटल्याने, ज्या व्यक्ती म्हणतात की “एकच मार्ग” उपलब्ध आहे त्यांना असहिष्णुतेणे अपात्र ठरविले जाईल. त्यामुळे सर्व गोष्टींचे माप हे सहिष्णुता नसून उलट सहिष्णुता आणि प्रेम यांच्याद्वारे बोलले गेलेले सत्य हे आहे.
शेवटी, बायबलच्या भाषेत बोलयाचे तर दोन मार्ग अस्तित्वात आहेत जे एकमेकांना विरोधी आहेत. एक रुंद (अनेक) जे विनाशाकडे घेवून जातो आणि दुसरा अरुंद (एक) आहे जो जीवनाकडे घेऊन जातो. ज्याप्रमाणे आपल्यापैकी बहुतेकांना चालण्यासाठी पाय देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे कोणत्या मार्गाने प्रवास करायचा हा पर्याय सुद्धा आपणास देण्यात आला आहे. माझे आपणास असे आव्हान आहे की आपण सर्व मार्गांना एकत्र करणाऱ्या रुंद मार्गाचा स्वीकार कराल की जीवनाकडे घेवून जाणाऱ्या अरुंद मार्गाने आपण जाणार आणि शोधार्थ प्रवास करणार? येशू म्हणाला की मी तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे आणि ‘त्याला’ वगळून कोणीही देवाकडे येत नाही.
शेवटी देव आपणास फक्त अंधपणे सत्य चाचपडण्यासाठी सोडून देणार नाही, तर उलट जेव्हा आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे त्याला शोधाल, तेव्हा तो कोण आहे या विशेष प्रकटीकरणाने तो आपले डोळे उघडेल.
मत्तय 11: 28-30
28 जे परिश्रम करतात आणि ज्यांच्यावर ओझे लादलेले आहे असे सर्वजण माझ्याकडे या, आणि मी तुम्हाला विश्रांति देईन. 29 माझे जू तुमच्या खांद्यावर घ्या, आणि माझ्याकडून शिका, कारण मी अंत: करणात सभ्य आणि नम्र आहे, आणि तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल. 30 कारण माझे जू साधे आहे, आणि माझे ओझे हलके आहे.”